बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क न वापरणाऱ्यांनो सावधान; आता भरावा लागणार एवढ्या रुपयांचा दंड!

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोनामुळे ठप्प पडलेलं पुन्हा एकदा सुरु होतय. अशातच सगळं पूर्वपदावर येत असल्यानं गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे गरजेच्या वेळीच बाहेर पडा, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता रेल्वे मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या नवीन नियमावलीनुसार मास्कचा वापर न केल्यास दंड आकारला जाणार आहे. त्यानुसार आता मास्क न घातल्यास त्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दसरा आणि दिवाळी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं कोरोना नियमावली सुरुच ठेवली आहे. त्यानुसार पुढील निर्देश येईपर्यंत हीच कोरोना नियमावली राहील. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

नुकतंच रेल्वे मंत्रालयानं कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका लक्षात घेता सगळ्यांनी कोरोना नियमांचं पालन करणं हे बंधनकारकच आहे. त्यामुळे रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वापरला नाही तर दंड आकारला जाईल.

थोडक्यात बातम्या – 

अन् चक्क अजित पवार थेट धरणाच्या मधोमध अडकले, त्यानंतर म्हणाले…

“पाहुणे घरात आहेत, ते गेले की मग…”; अजित पवारांचा आपल्या खास शैलीत टोला

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; साक्षीदार तर निघाला फरार आरोपी

एनसीबी कारवाईबाबत नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट, तर्कवितर्कांना उधाण

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More