बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनो सावधान, जडत आहे ‘हा’ विशिष्ट आजार

मुंबई | कोरोनाची साथ आल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांना घरात बसून काम करावं लागत आहे. त्यालाच ‘वर्क फ्रॉम होम’ असं म्हटलं जातं. कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे शरिराची हालचाल करण्याचं प्रमाण खुप कमी झालं  होतं.  त्यामुळे आता वर्क फ्रॉम होमचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. यामुळे एक विशिष्ट आजार जडत असल्याचं एका अभ्यासातुन समोर आलं आहे.

घरात बसून काम करणाऱ्यांपैकी  41 टक्के लोकांमध्ये मणका, पाठ आणि कंबर दुखी संबंधित काही आजार निर्माण झाल्याचं एका अभ्यासातुन समोर आलं आहे. पीएमसी लॅबने केलेल्या अभ्यासानुसार 41 टक्के लोकांना मणक्याचे तर 23.5 टक्के लोकांना मानेचे आजार जडल्याचं सांगितलं आहे.

अजूनही काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरात सतत कामासाठी एका जागी बसणं, अनेक तास जागेवरून न उठणं, हालचाल कमी करणं ही त्याची कारणे आहेत. वर्क फ्रॉम होममुळे मानसिक आरोग्यावर परिणामही झाले आहेत. घरात सतत असल्यामुळे चिडचिड होणे, कौटूंबिक कलह अशा गोष्टी समोर आल्या होत्या.

दरम्यान, वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे  यावर उपाय म्हणून दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक तासाला किमान सहा तासाचा ब्रेक घेणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच रोज योगासने आणि प्राणायाम करायला हवेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More