बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कोणत्याही कार्यक्रमात कोश्यारी आपलं परखड मत मांडताना दिसत आहेत. अशातच आता यवतमाळमधील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी ऐवजी इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तीला चांगलंच खडसावलं आहे. (Bhagat Singh Koshyari has slammed a person who speaks English)

जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या कार्यक्रमात इंग्रजीमध्ये सुत्रसंचालन करणाऱ्या एका व्यक्तीला मराठीत बोलण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. नाराजी व्यक्त करत कोश्यारी म्हणाले, हा महाराष्ट्र आहे इथं कार्यक्रमामध्ये मराठीत सुत्रसंचालन व्हायला पाहिजे.

मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठीही अनिवार्य असली पाहिजे, असं मत देखील कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मागील एका कार्यक्रमात एकाने इंग्रजीमध्ये सुत्रसंचालन केलं होतं, त्यावेळी तुला मराठी येत नाही का?, असा सवाल विचारला होता. महाराष्ट्रात मराठीत सुत्रसंचालन होईला पाहिजे, असं कोश्यारी म्हणाले आहेत.

दरम्यान, एखादा पाहुणा आता, एखाद्या परराज्यातून आला, जर त्याला हिंदी जमत नसेल तर इंग्रजी वापरण्यास काही हरकत नाही, असंही कोश्यारी म्हणाले आहेत. मराठी भाषा ही संस्कृत आणि हिंदीप्रमाणे गोड आणि साधी सरळ भाषा आहे, असंही कोश्यारी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

मोदी सरकार ‘अॅक्शन मोड’वर ; आता ‘या’ गोष्टींवर मिळणार अनुदान

पोटावरची चरबी कमी करायचीय? मग ‘या’ 5 सवयी लावून घ्याच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More