महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्र्यांना सगळीकडे जायला वेळ आहे… पण चैत्यभूमीवर जायला वेळ नाही”

मुंबई | मुख्यमंत्रिपदी विराजमान नंतर उद्धव ठाकरे सगळीकडे गेले. पण चैत्यभूमीवर जायला त्यांना वेळ नाही, असं म्हणत भाजपचे नेते भाई गिरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

6 डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी मुंबईतल्या दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर हजारो-लाखो लोक जमतात. बाबासाहेब आंबेडकराच्या स्मृतीस अभिवादन करतात. अनेकांचं प्रेरणास्थान असणाऱ्या चैत्यभूमीवर जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, असं म्हणत गिरकर यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीच्या बैठकीचं मला निमंत्रण आलं होतं. बैठकीला गेलो तेव्हा फक्त सुभाष देसाई मंत्री म्हणून उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री आणि आघाडीचे मंत्री उपस्थित नव्हते. ज्या दिवशी 15 लाख लोकं उपस्थित रहातात, अशा दिवसासंदर्भात महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते आघाडीचे मंत्रीही उपस्थित नव्हते, असंही भाई गिरकर म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ते स्वतः तयारी संदर्भातली बैठक घ्यायचे. राज्यपाल सुद्धा फडणवीस यांच्याबरोबर सकाळी 8 वाजता अभिवादन करायला चैत्यभूमीवर उपस्थित असायचे. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांना अजूनही चैत्यभूमीवर जायला वेळ मिळालेला नाही, असंही गिरकर म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या