महाराष्ट्र मुंबई

“हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य वाटतं, इतक्या निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय”

मुंबई | काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मला या माणसाचं आश्चर्य वाटतं, हा कृषी मंत्री होता. इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, असं भाई जगताप म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले. लाज वाटली पाहिजे, यांना सत्तेचा माज आलाय. तुमचा माज शेतकरी आणि कामगार उतरवेल, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

यांनी हे केलं त्यांनी ते केलं असं सांगता, तुम्ही काय केलं हे सांगा, असं म्हणत भाई जगताप यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या-

‘शीतल आज तू हवी होतीस’; लेकीसाठी विकास आमटेंची भावनिक पोस्ट

आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते, ते…. – अजित पवार

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या