मुंबई | कोरोनाने सर्व जगात हैदोस घातला आहे. आपल्या देशातील कोरोनाचा संसर्ग देशात पसरू न देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. आज लॉकडाउनचा आज 9 वा दिवस असून पंतप्रधान मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी केलेल्या आवाहनाची प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी खिल्ली उडवली आहे.
5 एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाईट (प्रकाशदिवे) बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केलं. यावर चेतन भगत यांनी ट्विटवर घंटा आणि दिवा यांची इमोजी शेअर केली आहे.
चेतन भगत समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून चेतन सतत सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. यावेळी त्यांनी थेट मोदींनी केलेल्या आवाहनाची खिलल्ली उडवली आहे.
दरम्यान, भगत यांनी केलेल्या ट्विटवर नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भगत यांच्यावरच नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
🔔 —> 🪔
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) April 3, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…
दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला
महत्वाच्या बातम्या-
5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे “
…वाटलं होतं मोदी काहीतरी पाऊल उचलतील पण त्यांच्याकडे ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवाय काहीच नाही”
5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता घरातल्या लाईट बंद करा आणि दरवाजात दिवे लावा अन् कोरोनाला पळवा- मोदी
Comments are closed.