बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेत नाराजीनाट्य!; भास्कर जाधवांनी झटकला राऊतांचा हात

रत्नागिरी |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्रिपद न मिळाल्यामुळं शिवसेनेतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. गणपतीपुळे येथील विकास आराखड्याच्या भूमीपूजन उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी व्यासपीठावर भास्कर जाधव यांची नाराजी उघड उघड पाहायला मिळाली.

भूमीपूजन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना एका फोटोत येण्याची विनंती केली. तेव्हा खासदार विनायक राऊत यांनी आमदार भास्कर जाधव यांना फोटोत येण्यासाठी आवाज दिला. मात्र भास्कर जाधवांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

विनायक राऊत स्वत: भास्कर जाधव यांना हात पकडून फोटोत येण्याची विनंती केली त्यावेळी राऊतांचा हात झटकत भास्कर जाधवांनी तोंड फिरवलं. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, व्यासपीठावर उदय सामंत, सुभाष देसाई यांच्यासह मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या-

“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”

महत्वाच्या बातम्या-

इंदुरीकरांची क्रेझ वाढली, चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे; शरद पवांरांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कानमंत्र

हो खरं सांगतोय; सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More