कोपर्डीचं स्मारक प्रकरणाला वेगळं वळण दिलं गेलं -भय्यू महाराज

औरंगाबाद | कोपर्डीचं स्मारक अन्यायाविरोधात होतं मात्र त्याला वेगळं वळण दिलं, असं भय्यू महाराज यांनी म्हटलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरचं मौन सोडलं.

स्मारकाची इच्छा पीडित कुटुंबाची होती. मी त्यांना घरगुती कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यातून वाद कसा निर्माण झाला कळलं नाही, असं ते म्हणाले. 

तसेच मला कशाचंही श्रेय घेण्याचा शौक नाही, मात्र यापूर्वी मी संभाजी महाराजांचा पुतळा बांधला होता, तेव्हा का विरोध केला नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या