बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई | सिनेजगतात नेहमीच काही ना काही घडत असतं. सिनेसृष्टीतील चेहऱ्यांना आपलं खासगी आयुष्य खूप जपावं लागतं. दररोज हजारो कॅमेरे त्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. कधी कुणाच्या खासगी आयुष्याला सार्वजनिक केलं जाईल याचा नेम नाही. भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा त्रिशाकर मधु हिच्या सोबत अगदी असाच प्रकार घडला आहे.

भोजपुरी सिनेमा जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून त्रिशाकर मधुची ओळख आहे. मधुचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सर्च केला जात असून त्याने भल्याभल्या व्हिडीओंना याबाबत मागे टाकलं आहे.

त्रिशाकरचा हा व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा याची माहीती विविध माध्यमांवर देण्यात आली आहे. हा व्हिडीओ की-वर्ड्सच्या माध्यमातून सर्च केला जात आहे. या अभिनेत्रीला जेंव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तिने लागलीच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावरून हटवला जावा, अशी विनंती त्रिशाकर मधु हिने केली आहे.

हा व्हिडीओ कुठेही शेअर करू नका. तो तुमच्याकडे असेल तर डिलीट करा, अशी विनंती त्रिशाकर मधुने केली आहे. दरम्यान, हा प्रकार ज्यांनी केला ते चुकीचं आहे. बिहारमधील लोकांची ही वाईट सवय आपल्याला माहिती नव्हती असं त्रिशाकर मधू संतापाने म्हणाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

भारतीय गोलंदाज ठरले लॉर्ड्सवर ‘बाजीगर’, भारताचा इतक्या धावांनी विजय

शरद पवारांचं अचानक ओबीसींप्रति प्रेम आज उफाळून आलं- गोपीचंद पडळकर

अफगाणिस्तानमध्ये ‘इतके’ भारतीय नागरिक पडलेत अडकून?; समोर आली आकडेवारी!

तालिनबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More