बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार सुहास कांदेंना धमकीचा फोन, छगन भुजबळांनी उचललं हे मोठं पाऊल!

नाशिक |  नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. नियोजन समितीची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देवून निधी विकल्याबाबत सुहास कांदे यांनी भुजबळांंविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या टोळीतील एका व्यक्तीचा कांदेंना धमकीचा फोन आल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.

अशातच आता छगन भुजबळ यांनी कांदेंना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचं पत्र त्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना दिलंं. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भुजबळ यांनी याबद्दल संपूर्ण माहिती घेवून  या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु करण्याचे आदेश नाशिक पोलिसांना दिले आहेत.

याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मंत्रीमंडळाची बैठक सुरु असताना मला याबद्दल माहिती मिळाली. यानंतर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबद्दल माहिती दिली.

तसेच या प्रकारणात ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे धमकी दिली गेल्यास राज्य सरकार हे सहन करणार नाही, असं देखील भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More