मुंबई | इंदोरीकर महाराजांच्या प्रकरणावरुन भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे खोटे आरोप माझ्यावर होत आहेत. मात्र, मी कधीही कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत आणि कधी दुखावणारही नाही. तरीही कोणाला तसं वाटत असेल तर मी मोठ्या मनाने माफी मागते, असं त्या म्हणाल्या आहेत.
ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख यांनी महिलांचा अपमान केल्यांने मी त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र, कोठेही वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माबद्दल मी कधीही चुकीचं बोलले नाही, असंही देसाई म्हणाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काहीजण मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांचा अनादर करणाऱ्या वक्तव्याचा मी विरोध केला आहे. त्यामुळे कृपया याला धार्मिक रंग देऊ नका, असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार इंदोरीकरांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
सीएएला घाबरण्यासारखे काहीही कारण नाही; मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
“राधाकृष्ण विखे पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील”
महत्वाच्या बातम्या-
मिसळसोबत ब्रेड नको पाव द्या; पुणेकर तरुणाचं आंदोलन व्हायरल
राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष- विश्वंभर चौधरी
Comments are closed.