देश

काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला घरचा आहेर!

नवी दिल्ली |  काँग्रेस हा रस्ता भरकटलेला पक्ष आहे, असं म्हणत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र अडीज महिने उलटूनही काँग्रेस आणखी सावरलेली दिसत नाही.

काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिली नाही. कलम 370 हटवण्याला माझा आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचा पाठिंबा होता. मात्र माझ्याच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्याला विरोध केला. यावरून पक्ष भरकटल्याचं दिसून आलं, असं ते म्हणाले.

भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी काँग्रेसला दिलेल्या घरच्या आहेरानंतर ते काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.

भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी जर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला तर हरियाणा काँग्रेसचं मोठं नुकसान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते स्वत:चा पक्ष काढणार असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार; विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

-धक्कादायक!!! मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

-ही अभिनेत्री म्हणते… सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे!

-शरद पवार म्हणतात… कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी!

-पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या