Top News महाराष्ट्र मुंबई

‘हे’ कारण सांगत सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं तीन कृषी कायद्यांना स्थगिती देताना केंद्र सरकार व आंदोलक शेतकरी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी चार जणांची समिती स्थापन केली. या समितीतून समितीतील सदस्य भूपिंदरसिंग मान यांनी समितीतून बाहेर पडत असल्याचं गुरुवारी स्पष्ट केलं.

भूपिंदरसिंग मान यांनी आपण शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करू शकत नसल्याचे कारण सांगत मान यांनी समितीचा त्याग केला.सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीमध्ये भूपिंदरसिंग मान यांच्यासह अनिल घनवट, प्रमोदकुमार जोशी आणि अशोक गुलाटी यांचा समावेश आहे.

स्थापन केलेली ही समिती सरकारधार्जिणी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी या समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर मान यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “आपण एक शेतकरी असण्याबरोबरच शेतकरी संघटनेचे नेतेही आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित समितीत सदस्य म्हणून राहण्याचे तत्त्वात बसत नाही. सबब या समितीचा त्याग करत आहे.”

दरम्यान, मान यांच्या या निर्णयाचं शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी स्वागत केलं. यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक असेल, असे संकेतही राकेश टिकेत यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रेणू शर्माच नव्हे तर त्यांचा वकीलही वादग्रस्त; या गोष्टीमुळे अडचणी वाढणार?

भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?

धनंजय मुंडे प्रकरणात IPS विश्वास नांगरे पाटील ‘ॲक्शन मोड’मध्ये!!!

‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या मनिष धुरींनी दिली धक्कादायक माहिती

प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या