बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचं निधन

नवी दिल्ली | कोरोनाने देशात हैदोस घातला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये राजकारणी, नेते, अभिनेेते अशा अनेक दिग्गजांना कोरोनाने आपलं शिकार केलं आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्विंगचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचं निधन झालं आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंह हे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्व प्रकारचे इलाज करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

यकृताच्या समस्येमुळे त्यांना कावीळ आणि इतरही आजारही झाले अखेर त्यानंतर डॉक्टरांनी हार मानली. त्यांची घरीच सेवा करण्यात येत होती मात्र गुरूवारी किरणपाल सिंह यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान,  यकृताच्या आजारामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स आणि नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. इंग्लंडमधील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू होते. गंभीर परिस्थितीतही किरणपाल यांनी भुवीला ‘आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ’ मध्ये वोट द्या, असं आवाहन केलं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

….म्हणून डॉन अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त!

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा; भावानेच आपल्या 5 वर्षाच्या बहिणीसोबत केलं ‘हे’ किळसवाणं कृत्य

कौतुकास्पद! गरोदरपणाच्या काळात घरबसल्या तयार केलं कोरोना चाचणीचं किट

पिनराई विजयन सलग दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More