बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली | जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षांबाबत परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता. जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी याची घोषणा केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, तिसर्‍या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 20 ते 25 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, चौथ्या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल.

जर एखाद्या विद्यार्थ्यानं यापूर्वी तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठी अर्ज केला नसेल तर त्याला आता अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, तिसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी 6 जुलै ते 8 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच चौथ्या सत्रातील परीक्षेसाठी 9 जुलै ते 12 जुलै दरम्यान अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा ही असणार आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता आम्ही मागील वेळेच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, देशाच्या इतिहासात जिथे जेईई परीक्षा एकदा घेण्यात येत असे, आता ते चार-चारवेळा घेण्यात आली आहे, असंही पोखरियाल यांनी म्हटलं.

 

थोडक्यात बातम्या – 

आज देखील सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा ताजे दर

मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? – रोहीणी खडसे

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधलं सगळ्यांच लक्ष

काँग्रेसला धक्का! काँग्रसचे माजी मंत्री राहिलेले ‘हे’ नेते होणार भाजपवासी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More