बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

नवी दिल्ली | पारंपारिक पद्धतीने शेती (Farm) केल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसानीला सामोरे जावं लागतं. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांना विविध नविन गोष्टी समजण्यास मदत होते. आता गुजरात सरकारने शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची (Tachnology) माहिती व्हावी आणि शेतीसंबंधित डिजिटल ज्ञान मिळवता यावं यासाठी एक नविन योजना आणली आहे. (Farmers will get money to buy smartphones)

या नविन योजने अंतर्गत गुजरात सरकार शेतकऱ्यांना स्मार्टफोन खरेदीसाठी 1500 रूपये देणार आहे.  स्मार्टफोनवर शेती संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचे व्हिडीओ पाहून शेतकरी नविन तंत्रज्ञानाची माहिती मिळवू शकतील. यासंदर्भात गुजरातच्या कृषी आणि शेतकरी कल्याण साहाय्यक विभागाने  दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे स्वत:ची जमीन आहे. तो व्यक्ती या  योजनेसाठी अर्ज करू शकतो.

शेतकरी स्मार्टफोनच्या एकूण किंमतीच्या 10 टक्के रकमेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज केलेली 10 टक्के रक्कम ही 1500 रूपयांपेक्षा अधिक असू नये ही अट गुजरात सरकारने घातली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी i-Khedut या पोर्टलला भेट द्यावी लागेल.

दरम्यान, डिजिटल इंडिया ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना किटक नाशके, आधुनिक उपकरणांचा उपयोग, कृषी संबंधित तज्ञांची मते काय आहेत? याची माहिती मिळावी याकरिता ही नविन योजना आणली आहे. शेतीचं पुढील नियोजन करत असताना हवामानाची माहिती मिळवी यासाठीही स्मार्टफोनची मदत शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

“भाजपने अन्नदात्याचा केलेला अपमानाला देश विसरणार नाही”

‘त्या’ बहूचर्चित पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पुर्ण

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More