हैद्राबाद | अतिवृष्टीमध्ये तेलंगणातील 70 नागरिकांना जीव गमवावा लागला. पावसामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झालेल्या प्रत्येक पीडित कुटुंबाला 10 हजार रुपये देण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
पावसामुळे ज्यांच्या घराची संपूर्ण पडझड झाली त्यांना 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर, काही प्रमाणात नुकसान झालेल्यांना 50 हजारांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
रस्ते आणि इतर पायाभूत सोयी सुविधांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याकामासाठी 550 कोटींच्या पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘निवडणूक हरलो, तर मला…’; डोनाल्ड ट्रम्प यांची मतदारांना भावनिक साद
अशी थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- देवेंद्र फडणवीस
“माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात”
“बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”