‘बिग बीं’नी अकाऊंट बंद करु नये म्हणून ट्विटरची धावपळ

मुंबई | ‘बिग बी’ अमिताभ बच्चन ट्विटर अकाऊंट बंद करणार ही बातमी ताजी असतानाच नुकतीच ट्विटरच्या टीमने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमिताभ यांना ट्विटरचं काम कसं चालतं हे समजावून सांगितलं. 

ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या कमी होत असल्याचं सांगत 1 फेब्रुवारीला ट्विटर अकाऊंट बंद करतोय, असं अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं होतं. मात्र ट्विटरच्या टीमने सांगितलेल्या गोष्टी पटल्यानंतर रविवारी अमिताभ यांनी पुन्हा ट्विट करत ट्विटर टीमचे आभार मानले.

‘ट्विटरची टीम मला भेटण्यासाठी सातासमुद्रापलिकडून आली आणि ट्विटरचं काम कसं चालतं हे त्यांनी मला समाजावून सांगितलं. त्यासाठी त्यांचे धन्यवाद, असं अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.