बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! काबूल विमानतळावर मोठा स्फोट

काबूल | दोन आठवड्यांआधी तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यु आणि अमेरिकेचे 3 सैनिक जखमी झाल्याची आकडेवारी समजत आहे.

काबूल विमानतळाच्या मुख्य म्हणजे एबी गेटजवळ हा स्फोट झाला. हा हल्ला आत्मघातकी  असल्याचं फ्रान्स आणि अमेरिकेने सांगितलं आहे. या स्फोटामध्ये 15 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

आम्ही काबूलमध्ये घडलेल्या स्फोटाबाबत तपास केला. या स्फोटामधील मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप समजू शकली नसल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोंवरून अंदाज येतो की अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र जखमी आणि मृतांच्या बाबतीतील कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

 

थोडक्यात बातम्या- 

“ओ लंके, 2 पावलं मागे नाही तर, 200 पावलं पुढे जात ठोकणार”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा केली- संजय राऊत

“शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला म्हणजे गांडूपणा”

तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण सरकार देश विकण्यात व्यस्त आहेत- राहुल गांधी

“मी जर गॅंगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More