नवी मुंबई | नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवीन गवते , दिपा गवते आणि अपर्णा गवते या भाजपला सोडसिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधणार आहेत. हे तिघेही गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आहेत.
आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही खुद्द गणेश नाईक हे भाजप सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेले नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येऊ शकतात, असं जयंत पाटील म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पुन्हा धाडले समन्स
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला
अभ्यासावरून पालक ओरडल्याने 14 वर्षांच्या मुलाने घर सोडलं; घरातून चोरले दीड लाख
शाब्बास! अजिंक्य रहाणेने केली डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी
मुंबईतील शाळा आणि कॉलेज ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद, महापालिकेचा निर्णय