ममता बॅनर्जींना मोठा झटका! ‘इतक्या’ आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत केला भाजपमध्ये प्रवेश
कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.
ममत बॅनर्जी यांच्या जवळच्या सहकारी आणि चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सोनाली गुहा आणि रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमधये प्रवेश केला आहे. तसेच चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेले जतू लाहिरी आणि फुटबॉलपटू दीपेन्दू विश्वास यांनीही उमेदवारी नाकारल्यानंतर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर 2 मे रोजी मतमोजणी होईल.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 50 महिलांना तिकीट देण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादयक पाऊल!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!
‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा
महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…
अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…
Comments are closed.