बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेला मोठा धक्का, पुण्यातील हा दिग्गज नेता पक्ष सोडण्याची शक्यता

पुणे | पुण्यातील मनसेच्या धडाडीच्या नेत्या रूपाली ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तसेच त्यांनी आपल्याच पक्षातील नेते आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सुरू असलेल्या समीर वानखेडे प्रकरणात रूपाली ठोंबरे यांनी एक पोस्ट केली होती.

रूपाली ठोंबरे यांनी समीर वानखेडे प्रकरणात केलेल्या पोस्टमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना एक वकील म्हणून वैयक्तिकरित्या मी ती पोस्ट केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोणत्याही मीडियाला ते दिलं नसल्याचंही त्यांनी नमुद केलं. त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांशी माझी भेट झाली पण ती पुण्यातील कामांसाठी भेट होती, असं सांगत त्याचा अर्थ मी मनसे सोडणार असा होत नाही, पण पक्षातील लोकांनी असाच त्रास दिला तर पक्ष सोडावा लागेल, असं सुचक वक्तव्य ठोंबरेंनी केलं आहे.

‘आमदारकीचं तिकीट कापलं तेव्हाही पक्ष सोडला नाही, माझ्यासोबत पक्षातील लोकांनी राजकारण केलं, रूपालीला कसं थांबवायचं याचे प्रयत्न काही जण सतत करत आहेत. त्याचे सर्व रेकाॅर्ड माझ्याकडे आहेत’, असा घणाघात रुपाली ठोंबरे यांनी बोलताना केला आहे.

मनसेतील काही रिकामटेकड्या मंडळींना मी पक्ष सोडून जावं, असं वाटत आहे, अशा भावना बोलून दाखवत, ‘मी 14 वर्षांपासून मनसेत फक्त राज ठाकरे यांच्याकडे बघून काम करते, पक्षातील लोकांनी असाच त्रास दिला तर मला पर्याय शोधावा लागेल, असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी पक्ष सोडण्यासंदर्भात संकेत दिले आहेत. त्यांनी जर पक्ष सोडला तर पुण्यात हा मनसेला मोठा धक्का बसेल, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना…; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More