मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांवर झालेल्या ईडी (Ed) कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलेलं जात आहे.
नवाब मलिक मनी लाॅर्डिंग प्रकरणी अद्यापही मलिकांना दिलासा मिळालेला नाहीये. आता पुन्हा मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मलिकांना सुनावलेली कोठडी आज संपत आली होती. आता ही कोठडी 22 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नवाब मलिकांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केल्यानं आता रमजान काळातही त्यांना कोठडीत रहावं लागणार आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटलं आहे. त्यामुळे सध्या मलिकांची खाती काढून घेतली आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. मनी लाॅर्डिंग प्रकरणात त्यांना ही अटक करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाल्या…
महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पाऊस कोसळणार
मोठी बातमी! SBIच्या ग्राहकांना मोठा झटका
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.