बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

मुंबई | सध्या मराठा आरक्षण, पदोन्नतीस आरक्षण आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून 19 जुलै होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा निवडणूक आयुक्तांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकंटाचं कारण देत ही ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची विनंती शासनाच्या वतीने निवडणूक आयोगाला पत्राने केली होती. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांना हे पत्र लिहलं होतं. त्यानंतर निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी मुख्य सचिवांच्या पत्राला प्रत्युतर देत निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे.

पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांमधील रद्द झालेली पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून 19 जुलै रोजीच होईल, असं उत्तर राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी शुक्रवारी सरकारला दिलं. त्यामुळे ही निवडणूक रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी भाजपने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. तर दुसरीकडे सरकारमधील ओबीसीचे नेते सुद्धा नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More