बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

चंदीगड | देशाच्या राजकारणात सध्या पंजाबमधील राजकीय परिस्थितीची जोरदार चर्चा होत आहे. विरोधकांकडून निवडणुका जिंकण्याची जोरदार तयारी सुरू असताना काँग्रेस देखील सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit  singh channi) यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा (Dept Forgivness)निर्णय जाहीर केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 10 दिवसांत होणार असल्याचं मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 2 लाख रुपयांपर्यंच कर्ज माफ करण्याच्या निर्णयासोबतच भूमीहीन मजुरांचे देखील कर्ज माफ केले असल्याचं मुख्यमंत्री चन्नी यांनी सांगितलं आहे. पंजाब सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More