मुंबई | कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग पाहता तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. त्यामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यावर पुन्हा ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शाळा-महाविद्यालये गेल्या 20 दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा सोमवारपासून शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच 24 जानेनारीपासून शाळा सुरु होणार आहेत. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी शाळा सुरु करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 1ली ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले असून याविषयीचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला
बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ
लसीकरणासाठी हमरीतुमरी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
पुणे पोलिसांना मोठं यश! अखेर 9 दिवसांनी अपहरण झालेला ‘तो’ चिमुरडा सापडला
Comments are closed.