बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारचा मोठा निर्णय! MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना मिळणार आणखी एक विशेष संधी

मुंबई | कोरोना काळात सर्वकाही ठप्प झालं होतं. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला होता. शिक्षणावर देखील त्याचा गंभीर परिणाम झाला होता. अशातच कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा (competitive examination) देखील पुढे ढकल्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक उमेदवारांचे वर्ष वाया गेलं होतं. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा निर्णय काढला आहे. त्यामुळे आता एमपीएससी उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

1 मार्च 2020 पासून ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे, असा आदेश काढण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वय ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटील म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस”

“12 खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन तुम्ही…”, धनंजय मुंडेंनी केलं रोहित पवारांचं कौतुक

सुकेश चंद्रशेखरचं नवं कनेक्शन! बाॅलिवूडमधील 12 अभिनेत्रींची नावं समोर आल्यानं खळबळ

…अन् भर कार्यक्रमात भाजप खासदाराने पैलवानाच्या कानशिलात लगावली

“ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात Pandemic Act लागू करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More