महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार जणांना मिळणार नोकऱ्या!
मुंबई | लोकांचा आता उत्तम गुंतवणूक क्षेत्राकडे कल मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. यातच आज राज्य सरकारनं एक मोठी गुंतवणूक केली आहे. सरकारच्या या गुंतवणूकीमुळे अनेक जणांना नोकरीची एक नवी संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या (State Government) या मोठ्या गुंतवणूकीचा (Investment) अनेकांना फायदा होणार आहे.
गुंतवणूक क्षेत्रात वेग चांगला असल्यानं राज्यात आज तब्बल 5051 कोटी गुंतवणूक करार (investment of Rs 5051 crore in the maharashtra ) करण्यात आले आहे. या करारांमुळे 9 हजार जणांना नोकरीची नवी संधी (Job Opportunity) मिळणार आहे.
दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागानं 12 कंपन्यांसोबत सुमारे 5051 हजार कोटींचा करार केला आहे. या करारातून 9 हजारांपेक्षा जास्त जणांना नोकऱ्या निर्माण होतील, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industy Minister Subhash Desai) यांनी सांगितलं.
दरम्यान, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत एकूण 1.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 3 लाख 34 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचंही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
‘…आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू’; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
चिंताजनक! Omicron झालेल्या मुलांमध्ये दिसून येतायेत ‘ही’ गंभीर लक्षणे
“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”
‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले
महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी
Comments are closed.