महाराष्ट्र मुंबई

ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

मुंबई |  फनी वादळाने ओडिशाला जबरदस्त तडाखा बसला आहे. ओडिशाची मदत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी रूपयांची घोषणा केली आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर भयंकर चतक्रीवादळात झाले. प्रचंड वेगाने हे वादळ दक्षिण किनारपट्टीकडे झेपावले. शुक्रवारी वादळाने ओडिशात धडक मारली.

वादळाची माहिती मिळाल्याने स्थानिक प्रशासन, ओरिसा सरकार आणि केंद्र सरकारने संपूर्ण खबरदारी घेतली होती. त्यामुळे मोठी हानी टाळता आली.

दरम्यान, केंद्र सरकारही ओडिशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

महत्वाच्या बातम्या

-या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

-‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

-माझ्यावर होणारे हल्ले भाजपने घडवून आणले- अरविंद केजरीवाल

-ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास टाळाटाळ!

-लढाई संपली आहे, तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय; राहुल गांधींचा मोदींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या