बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! तीन दिवसांनंतर छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण मागे

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन आमरण उपोषण सुरु होतं. छत्रपती संभाजीराजेंनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारनं संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

आज अखेर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या असून संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.

उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या अखेर सरकारनं मान्य केल्या असून यामधे काही आणखी मागण्यांचीही भर घातल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा आरक्षणबाबत 22 मागण्या पुढे आल्या, त्यापैकी 6 मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या होत्या. आज सलग तिसऱ्या दिवशी या मागण्या मान्य झाल्या असून जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार की आणखी चिघळणार?, दोन्ही देशात चर्चेला सुरुवात

संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा

अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…

“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More