बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग त्यात औषधांचा तुटवडा हे समोर असतानाच कोरोनाच्या संकटात औषधांचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनानं या बनावट औषधांच्या साठ्याची किंमत तब्बल 1.54 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त आणि परिणामकारक असलेल्या ‘फेविपिरावीर’ औषधांच्या गोळ्यांचा बनावट साठा मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यावर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिवसृष्टी सर्जीमेड, गोरेगाव, मेडिटेब वर्ल्डवाईड, कांदिवली आणि निरव ट्रेडलिंक मुंबई या 3 औषध विक्रेत्यांवर धाड टाकून फेविपिरावीर गोळ्या आणि हायड्रोक्सी क्लोरोक्विन औषधांचा बनावट साठा जप्त केला. याबाबत अधिक तपास केल्यानंतर असं समोर आलं की, मे.मॅक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश ही उत्पादन संस्था अस्तित्वाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी समतानगर, कांदिवली आणि गोरेगाव पूर्व पोलीस ठाण्यात औषध निरीक्षकांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तर, मॅक्स रिलीफ हेल्थकेअरचे मालक सुदीप मुखर्जी यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील पालिकेची 11 कोविड सेंटर होणार बंद; रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय

… आणि त्या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More