बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसूली प्रकरणी वादाच्या घेऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी ईडीसह सीबीआयचा देखील तपास सुरु आहे. आतापर्यंत अनेक बड्या अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. अशातच आता याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु लवकरच संजय पांडे आणि सीताराम कुंटे या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठीची वेळ आणि तारीख पाठवण्यात येणार आहे. अनिल देशमुखांच्या 100 कोटी वसूली प्रकरणी तपासाचा एक भाग म्हणून हा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

दरम्यान, पांडे आणि कुंटे या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयशी संवाद साधला होता. यामुळे सीबीआयला जर आणखी काही चौकशी करायची असेल तर त्यांनी ऑफिसमध्ये यावं, असं दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे,

सीबीआयच्या समन्सनंतर दोन्हीही अधिकाऱ्यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

पुण्यातील उद्यानाच्या नावावरुन नवा वाद, ‘साध्वी’ शब्द हटवण्याची मागणी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

जर परमबीर सिंह भारताबाहेर गेले असतील तर’..; गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More