बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

पणजी | बलात्काराच्या आरोपात तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर मागील 8 वर्षांपासून खटला चालू  होता. मात्र आज गोवा कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरुण तेजपाल यांच्यावर एका महिलेनं लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. अखेर गोवा कोर्टानं त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मे 2014 पासून तरुण तेजपाल जामीनावर बाहेर होते. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी 2014 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2,846 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.

अतिरिक्त जिल्हा न्यायालय 27 एप्रिलला निकाल जाहीर करणार होतं. मात्र, न्यायाधीश क्षमा जोशी यांनी या प्रकरणावरील निर्णयाला 12 मेपर्यंत स्थगिती दिली होती. पुन्हा एकदा याप्रकरणाची सुनावणी 19 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. न्यायालयानं कारण देत सांगितलं होतं की, कोरोना महामारीमुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

दरम्यान, तरुण तेजपाल यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही आपल्यावरील आरोपविरोधात दाद मागितली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती.तरुण तेजपाल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 342, 354, 354-ए , 376 (2) आणि 376 (2) (के) या कलमांतर्गत खटला सुरु होता. देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. अखेर 21 मे रोजी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्ततता करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

…पण मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही- उद्धव ठाकरे

कोरोनानं खासदाराचं कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांच्या अकराव्या-बाराव्याला दोन्ही मुलांचाही मृत्यू

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More