मोठी बातमी ! रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर
मुंबई | रेल्वेनं प्रवास महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत रेल्वेनं (Mumbai Railaway) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखावणार आहे.
एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्र्यांनी केली होती. अशातच आता प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर मुख्य मार्गावर एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढणार असून एकूण रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 होणार आहे.
सध्या उन्हाळ्यामुळं प्रवाशांना मोठ्य़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आता गारेगार होणार आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत
‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना…’; संजय राऊतांचा इशारा
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”
“मी माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे…”
Comments are closed.