बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना मोठा दिलासा

मुंबई | राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहेत. अशातच आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेविरूद्ध (Narayan Rane) शिवसेना, असा संघर्ष पहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. अधिश बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा प्रकारची तक्रार करण्यात आली आहे.

अधिश बंगल्याप्रकरणी आता नारायण राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिकेने दिलेली नोटीस मागे घेण्यात येत असल्याचं राज्याच्या महाअधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. त्यामुळे आता राणेंच्या बंगल्यावर कारवाई केली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता राणेंना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वीज पुरवठा थांबणार नाही”

“हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”

Russia Ukrain War | रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं ‘हे’ शहर उद्ध्वस्त, इतक्या लोकांचा मृत्यू

‘बहुतेक सदाभाऊंच्याच #*# आग लागली असावी’; पवारांवरील टीकेनंतर मिटकरी भडकले

भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More