बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

नागपूर | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकिकडे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत कलहाच्या चर्चा देखील दबक्या आवाजात चालू आहेत. अशातच आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहीलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत महाजेनकोच्या गैरकारभाराकडे बोट दाखवल्याचं बोललं जात आहे. महाजेनको म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वाशिंगच्या निविदा प्रक्रियेत गैरमार्गाचा वापर, घोळ आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करून काम दिल्याचा ठपका नाना पटोलेंनी ठेवला आहे.

तसेच नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना महाजेनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती देण्याची विनंती देखील केली आहे.  तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील पटोलेंनी केली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई  यांच्यासह शासनाच्या इतर काही संबंधित सचिव, खनिज महामंडळाचे चेअरमन यांना हे पत्र पाठवलं आहे. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना या पत्राची कॉफी देण्यात आली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांंना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहे!”

“इतिहासात पहिल्यांदाच राजभवनामधून भाजप कार्यालय सुरूये”

‘दगडफेक करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…’; गोपीचंद पडळकरांचा व्हिडीओ टाकत निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More