मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनि लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यावरुन वातावरण पेटलेलं असताना आता विरोधकांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले आहेत.
विरोधकाचे मोर्चे आझाद मैदानापासून काही अंतरावर मेट्रो सिनेमाजवळ अवडण्यात आलं आहे. शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र विरोधकांनी हा मोर्चा मागे घेण्याच नकार दिला.
मोर्चाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या गाडीत कोंबून नेण्यात आलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
थो़डक्यात बातम्या –
“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”
“सरकार आणखी खोलाशी जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल”
“कुणी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकणार”
“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
Comments are closed.