बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

नाशिक | राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे नाशिक महापालिकेचं रुग्णालय आहे. घटनेची माहिती मिळताच दुरुस्ती करण्यासाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र, या गळतीमध्ये आतापर्यंत रुग्णालयातील ऑक्सिजनवर असलेल्या 22  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहीती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्यानं हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकमध्ये गळती झाल्यानं तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात ‘ही’ काळजी घ्या; एम्सच्या संचालकांचा मोलाचा सल्ला

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

गजा मारणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; माजी खासदार संजय काकडेंना अटक

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More