बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

पुणे | शौर्यदिनाच्या निमित्ताने 1 जानेवारीला आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात कोरेगाव भीमा येथे जमला होता. यावेळी कोरेगाव तसेच सणसवाडी या दोन गावांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता कोरेगाव भीमा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

कोरेगाव भीमा प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाची चौकशी आता आयोगामार्फत करण्यात येत आहे. अशातच आता परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी यासंबंधी अर्ज केला होता. भीमा कोरेगाव हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंग हे एडीजी लाॅ अँड आर्डर संभाळत होते. तर रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त होत्या, त्यामुळे त्यांची साक्ष घेणं आवश्यक असल्याचं आशिष सातपुते यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शु्क्ला अडचणीत आल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लेटर बाॅम्ब फोडल्यानंतर रश्मी शुक्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More