बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला जमावाकडून बेदम मारहाण

रुद्रप्रयोग | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सतत कोणत्या न कोणत्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच देशातील विविध भागांमध्ये भाजप नेत्यांविरोधात जनतेचा संताप वाढताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये घडला आहे.

उत्तराखंडमधील काही लोकांचा देवस्थानम अॅक्टला विरोध आहे. यामुळे अनेकवेळा लोकांनी निदर्शने करत या अॅक्टला विरोध दर्शवला आहे. आज देखील उत्तराखंडमधील उखमीठामध्ये या अॅक्टला विरोध करणाऱ्या लोकांनी जोरदार गोंधळ घातला आहे. यावेळी भाजप नेते पंकज भट यांना जमावाने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीचा देखील पाठलाग केला.

पंकज भट आज उखमीठ येथे एका सभेसाठी गेले होते. मात्र, पंकज भट यांना पाहून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या तीर्थपुरोहितांना प्रचंड राग आला. यावेळी संतप्त जमावाने पंकज भट यांना घेरले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.

जमावाने चारही बाजूने भट यांना घेरले. अखेर भट जमावाच्या तावडीतून कसेबसे निसटले. यावेळी पंकज भट यांनी एका उंच भिंतीवरुन उडी घेत तिथे असलेल्या घरांचा आडोसा घेतला आणि जमावाच्या ताब्यातून आपली सुटका केली.

थोडक्यात बातम्या –

ड्रायव्हरला दिलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे सुजैन खान होतेय ट्रोल, पाहा व्हिडीओ!

महाराष्ट्रातील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी वाचा एका क्लिकवर 

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही’; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

“कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावं”

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 22 कोरोनाबाधितांची नोंद

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More