सांगली | सांगली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तीन तास उरले असताना भाजपचे दिलीप सुर्यवंशी यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
येत्या 1 ऑगस्टला महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. त्यासाठी काल रात्रीपासून सर्व पक्षीय नेत्यांची खलबते सुरु होती.
दरम्यान, सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!
-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा
-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!
-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे
-हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!