बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर राज्यभरात नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नारायण राणे यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई सुरू केली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतू तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

काल नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाड, औरंगाबाद आणि पुणेमध्ये देखील नारायण राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री नाशिकची एक टीम रत्नागिरीकडे रवाना झाली होती. तर पुण्यातूनही एक टीम रत्नागिरीकडे रवाना झाली होती.

दरम्यान, नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी केली जात आहे, असं राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

“तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More