बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

पुणे | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेषत: पुण्यात कोरोना रूग झपाट्याने वाढत आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशात पुण्यात कोरोना लस, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर या तीन गोष्टींची मोठी कमतरता भासत आहे.

एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल 6 ते 8 हजार रुपयांना विकलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यात सध्याच्या घडीला बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. पुणे जिल्ह्यात केवळ 143 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातोय.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरलं आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More