मुंबई | आजपर्यंत कधीतरी शिवसेनेच्या एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून संपर्क केला असेल तर सांगा, आताच पदाचा राजीनामा देतो. मात्र छत्रपतींच्या राज्यात दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आपण कायम चांगल्या गोष्टीसाठी हस्तक्षेप करणार, असं म्हणत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कुलगुरूंना चांगलीच समज दिली.
पुणे विद्यपीठात अनेक वर्षांपासून पडून असलेली छायाचित्रे लावायच्या सूचना केल्या किंवा रानडे इन्स्टिट्यूटची जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला असेल तर हा शिक्षण मंत्रीचा हस्तक्षेप ठरतो का?, असा सवाल सामंत यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या नागपूर येशील उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात उदय सामंत आले होते. यावेळी त्यांनी कुलगुरुंसमोरच आपली नाराजी व्यक्त केली.
काही कुलगुरू निवृत्त झाल्यावर आरोप करतात की उदय सामंत विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करतात. मात्र, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवा असेल, यांच्या स्वतःच्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर मंत्र्याची मदत हवी. मात्र चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सूचना दिल्या तर लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो, असं ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”
ओबीसी आरक्षणाबाबत दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.