बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

पुणे | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील 14 वर्षात भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं आहे.  त्याच्या कारकिर्दीत त्याने भारतीय संघासाठी अनेक नवीन खेळाडू घडवले आहेत. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं म्हटलं जात होतं. परंतू अनेक खेळाडूंनी नंतर रिषभ पंतची तुलना धोनीशी केली असल्याचं पहायला मिळालं होतं. आता इंग्लंडचा कर्णधार जाॅस बटलर याने सॅम करनची तुलना धोनीशी केली आहे.

सॅमची खेळी ही जबरदस्तच होती. मला खात्री आहे की सॅमला या खेळीबद्दल महेंद्रसिंग धोनीशी बोलायला आवडेल. मला सॅममध्ये धोनीचीच झलक पहायला मिळाली. धोनीही अनेक वेळा सामना रोमांचकारी स्थितीत घेऊन जात असे. आम्ही सामना गमावला असला तरी सॅमकडून खूप काही शिकायला मिळालं. खेळाडूने सामना एकहाती कसा जिंकून द्यावा हे यातून आम्हाला शिकायला भेटत आहे, असं जाॅस बटलर म्हणाला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतू सॅम करनने एकहाती चिवट झुंज दिली आणि भारताला विजयासाठी प्रतिक्षा करावी लागली. या सामन्यात सॅमने 89 चेंडूत 95 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर हा सामना तो अखेरच्या षटकापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे भारताला हा सामना फक्त 7 धावांनी जिंकता आला.

दरम्यान, सॅम करन हा आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळतो. तो महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत तयार झाला आहे. चेन्नईकडून खेळताना त्याने धोनीसोबत चांगली कामगिरी देखील केली होती. तर त्याची कामगिरी पाहून धोनीने त्याला अनेकदा सलामीला देखील पाठवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More