बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, नगरसेवकाचं नाव आल्यानं खळबळ

मुंबई | चार वर्षांपूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीत एक धक्कादायक घटना घडली होती. मिरवणूक सुरू असताना बबलु गवळी नावाच्या युवकानं पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबाराचा बदला घेण्याच्या उद्देशानं बबलु गवळीला मारण्यासाठी माजी नगरसेवक विवेक यादव यांनी दोन गुंडांना पैसे पुरवले होते. परंतु पोलिसांना मिळालेल्या एका टीपमुळे मोठा अपघात टळला आहे.

राजन जॉन राजमणी आणि हुसेन याकुब शेख हे दोन कुख्यात गुन्हेगार आहेत. ते दोघेही गेल्या काही वर्षापासून येरवड्याच्या कारागृहात होते. दोघंही काही दिवसांपूर्वी कोविडची रजा घेऊन येरवडा कारागृहाबाहेर आले. कारागृहातून बाहेर आल्यावर दोघांनी कोणाच्या तरी हत्येची सुपारी घेतली असल्याची माहिती समोर आली होती. त्याचसोबत त्यांच्याकडे धारदार शस्त्रं असल्याचाही संशय पोलिसांना होता.

कारागृहातून बाहेर आलेल्या राजन आणि हुसैनला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्या दोघांची झडती घेण्यात आली. त्यावेळी या दोघांकडे तीन गावठी पिस्तुल आणि काही जिवंत काडतुसे सापडली. त्याचबरोबर सव्वा लाख रूपयांची रक्कम देखील त्यांच्याजवळ आढळली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली.

चौकशी दरम्यान राजन आणि हुसेनने सुपारी घेतल्याचं मान्य केलं. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक विवेक यादव यांनी ही सुपारी दिल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीचे जबाब नोंदवून घेत विवेक यादव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणाचा या घटनेशी संबंध असल्याचं आता समोर आलं आहे. तर पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने लॉकडाऊन जाहीर करा”

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?, पाहा आरोप

‘मी 5 वेळा मोबाईल बदलला पण…’; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक आरोप

कोरोना लसीचं आता लय टेंशन घेऊ नका, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More