बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर!

नवी दिल्ली | देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडप्रकरणी मोठी बातमी समोर आलीये. इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukherjea) सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जी गेल्या साडे सहा वर्षांपासून कारागृहात आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणी तेव्हापासून मुंबईतील भायखळा कारागृहात आहे. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अनेकदा इंद्राणी मुखर्जीचा जामीन नाकारला होता.

इंद्राणी मुखर्जी कलम 437 अंतर्गत विशेष सूट मिळवण्यास ती पात्र आहे आणि ती बऱ्याच काळापासून तुरुंगात आहे. मात्र आता न्यायालयाने इंद्राणी मुखर्जींना दिलासा दिलाय.

दरम्यान, या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला होता, मात्र हे प्रकरण अद्याप सुटलेलं नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचं गूढ आजपर्यंत उलगडलेलं नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होतं की सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचं सांगितलं होतं, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचं उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केले होते. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.

गेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता आणि ती काश्मीरमध्ये होती. या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

थोडक्यात बातम्या- 

हार्दिक पटेल यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले…

काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

“अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी”

राज ठाकरेंनी पुण्यात दीड तासात खरेदी केली ‘इतक्या’ हजारांची पुस्तके!

“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More