Top News देश

बिहार-महाराष्ट्र आमनेसामने, त्या प्रकरणावरून नितीश कुमार थेट ठाकरे सरकारशी बोलणार!

मुंबई |  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवं नाट्य पाहायला मिळतंय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारच्या पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकने क्वारंटाईन केलं आहे.बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने दिलेल्या वागणुकीमुळे बिहार सरकार नाराज आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याच प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारशी बोलणार आहे. (Nitish Kumar Is Going To Speak Maharashtra Government Over IPS Vinay Tiwari Quarantined By BMC)

हाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार असून, आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही, असंही ते म्हणाले आहेत. (Nitish Kumar Is Going To Speak Maharashtra Government Over IPS Vinay Tiwari Quarantined By BMC)

 

 

बिहार पोलिस सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आले आहेत परंतू मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार बिहार पोलिसांना सहाकार्य करत नसल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केलाय.

दरम्यान,  नियमानुसार एस.पी. विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकने दिलं आहे. तर सुशांत केसमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे, असं वक्तव्य करत मुंबई पोलिसांची पाठराखण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

“जगणं राहिलंच, निदान त्याला मरु तरी द्या”

कोरोनाचा धुमाकूळ… देशात गेल्या तासांत तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या