बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

नवी दिल्ली | काश्मिर येथे दहशतवाद्यांकडून सतत हल्ले करण्यात येत आहेत. आता या दहशतवाद्यांनी काश्मिरच्या बाहेरच्या लोकांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात बिहारचे माझी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एक मागणी केली आहे.

रविवारी दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन बिहारी मजुरांची हत्या केली. तर श्रीनगर आणि पुलवामा येथेही दोन मजूरांची हत्या करण्यात आली. यासंदर्भात मांझी यांनी ट्विट करत मोंदीकडे काश्मिरची जबाबदारी बिहाऱ्यांकडे द्यावी, 15 दिवसात सुधारून दाखवू, अशी मागणी करून टोला लगावला आहे.

काश्मिरमध्ये सतत आमच्या बिहारी बांधवाची हत्या केली जात आहे. ज्यामुळे मन अक्षरश: व्याकुळ झालं आहे. जर परिस्थितीमध्ये बदल होत नसेल तर मोदी आमि शहा यांना विनंती आहे, की काश्मिरची परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आम्हा बिहाऱ्यांकडे द्यावी 15 दिवसात बदल झाला नाही तर सांगा, असं त्यांनी म्हटलंय.

मागील काही दिवसांपासून काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी परप्रांतिय आणि अल्पसंख्याकांना निशाणा बनवलं आहे. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधातील हालचाली अधिक मजबूत केलेल्या आहेत. जागोजागी सुरक्षा जवान तैनात असल्याने दहशतवादी आता काश्मिर बाहेरील लोकांवर हल्ले करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”

कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!

“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More