बिहारच्या राजभवनावर रात्री दीड वाजता निघाला मोर्चा

पाटणा | मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने त्यांना पाठिंबा जाहीर केला. दोन्ही पक्षांनी लगेचच शपथविधीची घोषणा केली. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी रात्री दीड वाजताच राजभवनावर मोर्चा काढला.

राज्यात सर्वाधिक जागा आमच्या पक्षाला असताना आम्हाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजभवनावर त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. मात्र आता आरजेडीने याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या